
इगतपुरी प्रतिनिधी – विकास पुणेकर
इगतपुरी, 26 सप्टेंबर 2025 – पोदार इंटरनॅशनल स्कुल, इगतपुरी येथे पारंपरिक रंगांनी नटलेला ‘गरबा नाईट’चा कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही पारंपरिक वेशभूषा परिधान करून गरब्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
हा कार्यक्रम शाळेचे आदरणीय प्राचार्य श्री. संदेश खताळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. ढोल-ताशांच्या गजरात व संगीताच्या तालावर संपूर्ण शाळा परिसर आनंदात न्हालेला दिसला.
पालकांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक करत शाळेच्या सांस्कृतिक उपक्रमांना भरभरून दाद दिली. प्राचार्य सरांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आभार मानले.