
पूर्वोत्तर राज्यातील भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आसाममध्येभाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. गेल्या १० वर्षांपासून निर्विवाद सत्ता असलेल्या या राज्यात भाजपानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे.
या निवडणुकीत माजी उग्रवादी नेता हगरामा मोहिलारी यांच्या बोडोलँड पीपल्स फ्रंट पक्षाने जोरदार मुसंडी मारताना ४० पैकी २८ जागांवर विजय मिळवला. तर भाजपा केवळ ५ जागांवरच समाधान मानावे लागले. तर भाजपाचा जुना सहकारी असलेल्या युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल पक्षाला ७ जागा मिळाल्या.
हगरामा मोहिलारी यांच्या पक्षाला मिळालेल्या यशामुळे पुढील वर्षी होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या घोडदौडीला ब्रेक लागला. या निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात होतं. मात्र हे निकाल भाजपासाठी धक्कादायक असल्याचे मानण्यास मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी नकार दिला आहेत. बीपीएफसुद्धा एनडीएमध्येच आहे त्यामुळे ४० पैकी ४० जागा ह्या एनडीएच्या खात्यात आल्या आहेत. तसेच जुबीन गर्ग यांच्य निधनामुळे भाजपाला शेवटच्या क्षणी प्रचाराची संधी मिळाली नव्हती, असेही त्यांनी सांगितले.