
दैनिक चालु वार्ता चाकण प्रतिनिधी -प्रविण साकोरे
जिल्हा क्रीडा सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे, तालुका क्रीडा अधिकारी खेड, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना व रामभाऊ म्हाळंगी विद्यालय कडूस यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे सचिव रामदास रेटवडे,नितीन वरकड, संतोष काळे, शुद्धमती पवार,संभाजी काळे, यांच्या उत्तम नियोजनाखाली
सोमवार दिनांक 29/9/2025 संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय कॅरम स्पर्धेत श्री रेणुका माध्यमिक विद्यालय रासे च्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.
14 वर्ष वयोगट मुले
1)समाधान अनिल शिरसाट-6 क्रमांक
14 वर्ष वयोगट मुली-
2)रिना दशरथ कुटे -4 क्रमांक
3)श्रावणी दिपक कुटे-7क्रमांक
4)आर्या रामदास मुंगसे-8क्रमांक
17वयोगट मुले
5)यश राजेश शिंदे-9क्रमांक
प्राप्त केला.कॅरम स्पर्धेत १३तालुक्यांमधून 500 खेळाडू सहभागी झाले होते. रात्रीचे 10:30 वाजता फायनल मॅच संपन्न झाली. खेळाडूंनी छान कामगिरी करत विजयश्री खेचून आणली.
यामध्ये शिरसाट समाधान अनिल व रिना दशरथ कुटे या खेळांडूची विभाग पातळीवर निवड झाली त्याबद्दल त्यांचे श्री बापदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयभाऊ शिंदे, सचिव दिपक मुंगसे सर,उपाध्यक्ष वामन मुंगसे, माजी अध्यक्ष किसनराव शिंदे, कार्याध्यक्ष जगन्नाथ शिंदे, संचालक रामचंद्र शिंदे, नवनाथ शिंदे, सुवर्णाताई वाडेकर, स्वातीताई शिंदे, मुख्याध्यापक सुवर्णा बोर्हाडे,शिक्षक संजीव भोर, संजयकुमार पिचके, कल्पना गायकवाड, अंजली झिंजुरके, संदिप पाटील, राजू शिंदे, नितीन कडलग, शिक्षक पालक संघाचे सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, सरपंच किरण ठाकर व सर्व ग्रा.पं.सदस्य, सोसायटीचे संचालक, पालक,माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी विजयी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे श्री.संतोष काळे सर,वसंत मुंगसे यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील विभाग स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .