
भारत-पाक युद्धात…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारत-पाकिस्तान युद्ध मी रोखल्याचा दावा करत आहेत. नुकताच त्यांनी परत एकदा हे युद्ध आपण थांबवल्याचे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जर माझ्याकडे टॅरिफची शक्ती नसती तर जगातील कमीत कमी 7 पैकी 4 युद्धे अजूनही सुरू असती.
तुम्ही भारत-पाकिस्तानचे युद्ध बघितले असेल तर त्यांनी 7 विमाने पाडली होती आणि त्या दिशेने त्यांचे युद्ध सुरू होते. पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, टॅरिफमुळे फक्त आर्थिक फायदाच होत नाहीये तर जगात शांतता देखील आहे.
मी ते एकदम करू इच्छित नक्कीच नाही. आम्ही फक्त अरबो डॉलरमध्ये कमाई करत नाहीत तर टॅरिफमुळे शांतता प्रस्तापित करण्यास मोठी मदत होत आहे. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्धाबद्दल दावा करताना दिसले आहेत. मात्र, यापूर्वी बऱ्याचदा भारताने स्पष्ट केले की, अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे नाही तर व्दिपक्षीय संबंधांमुळे भारत-पाक युद्ध थांबले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.
रिपोर्टनुसार, लवकरच भारत-अमेरिकेत व्यापार करार होईल आणि परिस्थिती अगोदरप्रमाणे सुरळीत होईल. डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तान यांच्यातील जवळीकता मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतरही भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. टॅरिफ लावल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प भारताबद्दल वेगवेगळ्या प्रकारची दावे करताना दिसतात. त्यामध्येच त्यांनी पुन्हा भारत-पाकिस्तान युद्धावर भाष्य केले.
डोनाल्ड ट्रम्प एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप जास्त चांगले मित्र आहेत आणि भारत- अमेरिकेतील संबंध मजबूत आहेत, सांगताना दिसतात. मात्र, दुसरीकडे भारताला अडचणीत आणण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. त्यांनी H-1B व्हिसाबद्दलही अत्यंत धक्कादायक असा निर्णय घेतला. भारतीय लोक मोठ्या प्रमाणात H-1B व्हिसावर गेली आहेत आणि तिथे नोकऱ्या करतात. मात्र, आता H-1B व्हिसासाठी तब्बल 88 लाख रूपये शुल्क आकारले आहे. ज्यानंतर आयटी कंपन्यांना मोठा धक्का बसला.