
पराभवाचं मोठं कारण पाहा…
गौतम गंभीर यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही, असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. कारण जो खेळाडू आशिया कपमध्ये भारतासाठी मॅचविनर ठरला होता, त्या महत्वाच्या खेळाडूलाच गौतम गंभीर यांनी पहिल्या वनडे सामन्यात स्थान दिले नसल्याचे आता समोर आले आहे.
त्यामुळे भारताच्या पराभवाचे एक एक महत्वाचे कारण असल्याचे आता समोर येत आहे.
भारतीय संघाला पहिल्या सामन्यात लाजीरवाणा परभव पत्करावा लागला. भारताला एक तर या सामन्यात चांगल्या धावा करता आल्या नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना अचूक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जेरीस धरता आले नाही. पण यामध्ये जशी खेळाडूंची चूक आहे तरी संघ निवडणाऱ्या गौतम गंभीर यांची तर मोठी चूक असल्याचे आता समोर आले आहे. कारण जो खेळाडू चांगल्या फॉर्मात आहे, त्याला संधी देणे हे प्रत्येक प्रशिक्षकाचे काम असते. पण गंभीर यांनी आपल्या लाडक्या खेळाडूंना संधी देण्याच्या नादात मॅचविनर खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
गौतम गंभीर यांनी आपल्या लाडक्या हर्षित राणाला पहिल्या वनडेसाठी संघात स्थान दिले. ज्याला फलंदाजी करताच येत नाही. पहिल्या षटकात त्याने ९ धावा दिल्या आणि शुभमन गिलला त्याची गोलंदाजी बंद करावी लागली. पण ज्याने आशिया कप गाजवला. तब्बल १७ विकेट्स काढत जो भारतासाठी मॅचविनर ठरला त्या कुलदीप यादवला वनडे संघात स्थानच दिले नाही. कुलदीप यादवने आतापर्यंत प्रत्येक सामन्यात भारताला विकेट्स मिळवून दिल्या आहेत. कठीण काळात त्याने संघाला तारले आहे. पण गौतम गंभीर यांना आपल्या लाडक्या हर्षित राणापुढे कुलदीप यादव फॉर्मात असूनही दिसला नाही. त्यामुळेच आता गौतम गंभीर हे जोरदार ट्रोल होत असल्याचे समोर येत आहे. कारण एका चांगल्या खेळाडूचा बळी गौतम गंभीर देत असल्याचे आता म्हटले जात आहे.
गौतम गंभीर यांनी संघ निवडताना आपल्या लाडक्या खेळाडूला बरोबर संधी दिली. पण ज्याने आशिया कप जिंकवला त्या खेळाडूला मात्र संघातच स्थान दिले नाही.