त्या 3 गोष्टी काय ?
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका २८ वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. ही फक्त आत्महत्या नाही, तर नातेसंबंध, दबाव आणि व्यवस्थेच्या वास्तवाची एक वेदनादायी कथा बनली आहे.
डॉक्टरच्या हाताच्या तळव्यावर लिहिलेला नोट, पोलिस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप आणि एका टेक्निशियनसोबत बिघडलेले नाते यामुळे हे प्रकरण आणखी रहस्यमयी बनले आहे. या प्रकरणात सतत मोठे खुलासे होत आहेत. नुकत्याच झालेल्या खुलाशाने सर्वांचे लक्ष वेधलो आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर डॉक्टर महिला राहत होती. पण अचानक तिच्या घराला कुलूप लावण्यात आले. तसेच तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यमध्ये देखील वाद झाला होता. प्रशांत बनकरला राग अनावर झाला. त्याने या वादानंतर तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठे जायचं म्हणून तरुणी डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला. या हॉटेलच्या खोलीतच तिने स्वत:ला संपवून टाकले आहे. शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
हाताच्या तळव्यावर लिहिलेली सुसाईड नोट
सातारा पोलिसांच्या मते, डॉक्टरच्या हाताच्या तळव्यावर लिहिलेली नोट ही तिच्या आत्महत्यचे गूढ उलघडणारी ठरत आहेत. यात पीएलआय आणि घरमालकाच्या मुलाचे (जो व्यवसायाने टेक्निशियन आहे) त्याचे नाव लिहिलेले आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भरतीय न्याय संहिता) कलम ६४ (बलात्कार) आणि १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. सुसाईड नोट व्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्समधून नात्यातील तणाव आणि मानसिक दबावाची पुष्टी झाली आहे.
नातेसंबंध, लग्नाचा प्रस्ताव आणि आरोपांची गुंतागुंत
पोलिस तपासात समोर आलं की, डॉक्टर आणि टेक्निशियन यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून नाते होतं. पण गेल्या काही दिवसांपासून ते बिघडले होते. टेक्निशियनच्या कुटुंबाने दावा केला की, डॉक्टरने लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याला त्याच्या भावाने नाकारले होते. कुटुंबाचे म्हणणा आहे की, डॉक्टर सतत फोन करून त्रास देत होती. तर पोलिसांच्या मते, आरोपी टेक्निशियन तिच्यावर लग्न आणि शारीरिक संबंध कायम ठेवण्याचा दबाव टाकत होता. चॅट्समध्ये डॉक्टरने ‘तणाव’ आणि ‘डिप्रेशन’ सारख्या गोष्टी लिहिल्या होत्या.
पोलिस दबाव आणि राजकीय कनेक्शन
डॉक्टरच्या नातेवाईकांनी आरोप केला की, स्थानिक पोलिस पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत होते. दुसरीकडे, शिवसेना (युबीटी) नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत पूर्व भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सहाय्यकांवर दबाव टाकल्याचा दावा केला. निंबाळकर यांनी सर्व आरोप फेटाळत म्हटलं की, “माझ्या नावाचा कोणत्याही दस्तऐवजात उल्लेख नाही, तांत्रिक तपास सत्य समोर आणेल.”
अटक आणि तपासाची दिशा
टेक्निशियनला शनिवारी सकाळी अटक करण्यात आली तर पीएसआय गोपाळ बदनेने रात्री फलटण पोलिसांसमोर शरणागती पत्करली. कोर्टाने टेक्निशियनला २८ ऑक्टोबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आता कॉल डिटेल्स, सोशल मीडिया रेकॉर्ड्स आणि चॅट्सची तांत्रिक तपासणी करत आहेत.


