अजितदादांनी अखेर ‘अॅक्शन’ घेतलीच; पहिला दणका अध्यक्षांना !
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातील लावणीच्या कार्यक्रमाच्या व्हिडीओमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. लावणी करणारी महिला राष्ट्रवादी काँग्रेसची ( NCP) कार्यकर्ता असल्याचा दावा अध्यक्षांनी केला असला तरी ती प्रोफेशनल डान्सर असल्याचे समोर आले.
तिने तीन ते चार लावण्या कार्यालयात सादर केल्याचे समोर आले आहे. लावणीचा व्हिडीओ व्हायरल होताच याची दखल गंभीर दाखल घेऊन पक्षाच्यावतीने अध्यक्षांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांनी ही नोटीस बाजवली आहे. नोटीसमध्ये त्यांनी पक्ष कार्यालयात दीपावली मिलन कार्यक्रमादरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी नृत्य व नाचगाणी यासारखा कार्यक्रम पक्ष कार्यालयात घेतला आणि तो समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्धी होत असल्याने पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार या प्रकाराबाबतचा आपला लेखी खुलासा सात दिवसांच्या आता त्यांच्याकडे सादर करावा, असे म्हटले आहे. त्यामुळे नवनियुक्त अध्यक्ष अनिल अहीरकर अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी कार्यालयातील लावणीचा व्हीडीओ सध्या राज्यभर चांगलाच गाजत आहे. अध्यक्षांनी मात्र हा व्यावसायिक कार्यक्रम नव्हता, दीपावली मिलन कार्यक्रम होता, सर्वांनी स्वेच्छेने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याचे सांगितले.
लावणी सादर करणारी आमच्याच पक्षाची कार्यकर्ता आहे असा दावाही त्यांनी केला आहे. मात्र प्रत्यक्षात लावणी सादर करण्यासाठी एका महिलेला बोलावण्यात आले होते. तीच राष्ट्रवादी काँग्रेसशी काही संबंध नाही. ती व्यावसायिक नृत्यांगना असून नागपूरमध्ये स्टेज शो करत असल्याचे समोर आले आहे. या महिलेने तीन ते चार लावण्यास यावेळी सादर केल्या.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी या लावणीचा आनंद घेत आहे आणि ‘वन्स मोअर’ करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. या लावणीच्या व्हिडीओमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच ट्रोल केले जात आहे. अनिल अहीरकर यांची दोनच महिन्यांपूर्वी नागपूर शहराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते प्रदेश उपाध्यक्ष होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही अहीरकर अडीच वर्षे शहराचे अध्यक्ष होते.
अनिल अहीरकर यांची दोनच महिन्यांपूर्वी नागपूर शहराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते प्रदेश उपाध्यक्ष होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही अहीरकर अडीच वर्षे शहराचे अध्यक्ष होते.


