भारत चॅम्पियन हे वाचून…
मुंबई : भारताने प्रथमच वर्ल्ड कपला गवसणी घातली आणि त्यानंतर भारताची नॅशनल क्रश स्मृती मानधना ही भावूक झाली. स्मृतीने सामना संपल्यावर एका वाक्यात सर्वांची मनं जिंकल्याचे पाहायला मिळाले.
या वर्ल्ड कपमध्ये स्मृतीची भूमिक सर्वात महत्वाची होती. कारण स्मृतीने या वर्ल्ड कपमध्ये भारताला चांगली सुरुवात करून देण्याचे काम चोख बजावले होते. या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा या स्मृतीच्या नावावर होत्या. त्यामुळे या वर्ल्ड कप विजयात स्मृतीचा मोलाचा वाटा आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि स्मृतीने आपल्या भावनांना यावेळी वाट मोकळी करून दिली.
वर्ल्ड कप जिंकल्यावर स्मृती म्हणाली की, ” मला कळत नाही की वर्ल्ड कप जिंकल्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी. अजूनही मी स्वप्नातच बुडाली आहे. क्रिकेटच्या मैदानावर मी भावनिक झाली नाही. पण हा एक अवास्तव क्षण आहे. घरचा विश्वचषक, आणि फक्त “भारत चॅम्पियन” हे वाचून खूप आनंद होत आहे. माझ्यासाठी हा स्वप्नवत क्षण आहे. प्रत्येक विश्वचषक, आपण जातो आणि आपल्या सर्वांसाठी खूप दुःखद क्षण आले होते. महिला क्रिकेटमध्ये आपली जबाबदारी जास्त आहे, असे मला नेहमीच वाटते. खरंच आपल्याला मिळालेला पाठिंबा पाहून, म्हणजे, गेल्या ४० दिवसांचे कसे वर्णन करावे हे मला कळत नाही. गेला टी२० विश्वचषक आमच्यासाठी कठीण होता. आमच्या फिटनेसवर काम करण्यावर, प्रत्येक पैलूवर काम करण्यावर आमचे स्पष्ट लक्ष होते. ज्या पद्धतीने सर्वजण एकत्र आले आणि खेळले. या विश्वचषकात, प्रत्येकजण एकमेकांसाठी होता. संघाचे वातावरण कसे आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि ही फक्त जादू आहे.” स्मृती मानधनाने यावेळी भारतीयांना अभिमानाचा क्षण दिला.. भारत चॅम्पियन हे वाचून आनंद झाल्याचे म्हणत स्मृतीने यावेळी सर्वांची मनं जिंकली.
भारतीय संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातली. त्यामुळे भारतासाठी हा विजय सर्वात महत्वाचा ठरला. भारताच्या महिलांनी यावेळी अप्रतिम खेळ सादर केला आणि सर्व देशवासियांना आनंदाचे क्षण यावेळी दिले. यामध्ये स्मृती मानधनाचा वाटाही सर्वात महत्वाचा आहे.


