अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचण्यांबाबत धक्कादायक विधान करून जगात एकच खळबळ उडवून दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसह अजून काही देशांची थेटपणे नाव घेत दावा केला की, पाकिस्तान अण्वस्त्रांची चाचणी करत आहे.
त्यासोबतच त्यांनी चीनचेही नाव घेतले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, सर्वच देश अण्वस्त्राच्या चाचण्या करत आहेत. मग आपण तरी मागे का राहायचे? उत्तर कोरिया दर महिन्याला अण्वस्त्र चाचण्या घेत असल्याचे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचण्या करण्याचे थेट मोठे आदेश दिले आहेत. अमेरिेकेने देखील अण्वस्त्र चाचण्या सुरू करण्याची गरज आहे. अमेरिकेकडे इतकी मोठी अण्वस्त्रची ताकद आहे की, संपूर्ण जगाला 150 वेळा अमेरिका नष्ट करू शकते, असेही त्यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या खुलाशानंतर मोठा फायदा भारताला होणार असल्याचे स्पष्ट आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्रे आहेत. त्यावेळी दोन्ही देशांमधील तणाव वाढत होता, तेव्हा संपूर्ण जग चिंतेत होते. अण्वस्त्रांबाबत भारत पाकिस्तानची नीती वेगळी आहे. पाकिस्तानला त्यांची सुरक्षा धोक्यात दिसत असेल तर अगोदर अण्वस्त्राचा वापर करू शकतो. मात्र, भारत हा पहिल्यांदा अण्वस्त्राचा वापर करणार नाही.
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र हल्ल्याची स्थिती निर्माण होती. भारताचे दोन्ही शेजारी देश चीन आणि पाकिस्तान सतत अण्वस्त्राच्या चाचण्या करत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालंय. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि ट्रम्प यांची भेट झाली. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. कोणते कोणते देश अण्वस्त्र चाचण्या करत आहेत, त्यांची संपूर्ण यादीच डोनाल्ड ट्रम्प यांनी वाचून दाखवली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यामुळे पाकिस्तानला नक्कीच मोठा झटका बसला. अमेरिकेने स्वतःच अणुचाचण्या पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे भारताला मोठी संधी नक्कीच मिळालीये. अमेरिका उघडपणे सांगून चाचण्या करत असेल मग भारत देखील स्वत: च्या सुरक्षेचे कारण देत अण्वस्त्र चाचण्या करू शकतो. सर्वात जास्त धोका तर भारतालाच आहे. कारण भारताचे शेजारी दोन्ही देश अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.


