रत्नागिरी प्रतिनीधी – समिर शिरवडकर
राजापूर दि. ०४ नोव्हेंबर :- त्रिपुरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर संवेदना जागृती संघाने आपले तालुका तसेच शहर अध्यक्ष जाहीर केले आहेत,अशी घोषणा संवेदना जागृती संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम भानू खांबल यांनी त्रिपुरा पौर्णिमे च्या शुभमुहूर्तावर केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य सचिवपदी कार्यरत असणाऱ्या समीर विजय शिरवडकर यांची राजापूर तालुकाध्यक्षपदी तर, शहरातील धडाडीचे समाजसेवक जगदीश श्रीधर नाचणकर यांची राजापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे.
ज्याप्रमाणे भगवान शिवशंकरांनी प्रजेला दुःख, अन्याय आणि अत्याचारातून मुक्त करण्यासाठी अधर्मी त्रिपुर राक्षसाचा वध केला त्याचप्रमाणे आज समाजात वावरणाऱ्या अनेक त्रिपुर राक्षस या विचारसरणीचा नाश किंवा वध करण्यासाठी आणि जनतेला अन्याय, अत्याचार, काळाबाजार आणि बेसुमार लाचखोरी या जाचातून मुक्त करण्यासाठी भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने संवेदना जागृती संघ सज्ज झाला आहे. नूतन तालुका अध्यक्ष तसेच राजापूर शहराध्यक्ष यांना समाजाभिमुख कार्य करण्यासाठी संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खांबल, सचिव अद्वैत अभ्यंकर तसेच कोषाध्यक्ष अमोल सोगम यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


