ठाणे ग्रामीण प्रतिनिधी,विकी जाधव
शहापूर (जि. ठाणे) — अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तालुका शहापूर येथे पदनियुक्ती व सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा) यांच्या अनुमतीने ५ नोव्हेंबर २०२५ रोजी शहापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका महिला अध्यक्ष श्रीमती मंजुळाताई कालचिडा आणि तालुका अध्यक्ष श्री नितीन भाऊ खरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमास सुमारे साडेतीनशे महिला आणि पन्नास पुरुष अशा मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग लाभला.
कार्यक्रमात प्रदेश प्रवक्ते मच्छिंद्र मगर दादा यांनी संघटनेची बांधणी कशी करावी आणि जनतेच्या मनात संघटनेविषयी आवड निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीने कार्य करावे याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवती अध्यक्षा सना ताई शेख यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करत आदरणीय बाबांच्या समाजकार्याचा जीवनप्रवास सांगितला आणि संघटनेचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले.
मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष मनोज बाळासाहेब सानप पाटील दादा, नाशिक महानगर प्रमुख प्रकाश गांगुर्डे (सूत्रसंचालक), तसेच सचिन दादा यांनीही आपले विचार मांडून मार्गदर्शन केले.
मच्छिंद्र मगर दादा यांनी गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी सर्वांनी तन-मन-धनाने एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांनी ग्रामस्थांना संघटनेत सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन करत सामाजिक परिवर्तनासाठी संघटनशक्तीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी स्थानिक 400 महिला व पुरुष कार्यकर्त्यांना समितीचे आयडेंटी कार्ड व नियुक्तीपत्र देण्यात आले. आगामी काळात अजून अनेक पदाधिकारी शहापूर तालुक्यात समितीत सहभागी होणार असल्याचे तालुका महिला अध्यक्ष मंजुळा ताई कालचिडा (सरपंच) यांनी सांगितले.
मच्छिंद्र मगर दादा यांनी घेतलेली ही गावोगावी जाऊन उपक्रम राबवण्याची पुढाकार स्तुत्य असून त्यांच्या पुढील वाटचालीस अभिनंदन आणि शुभेच्छा!



