अमेरिकेच्या कंपन्यांची खळबळजनक मागणी; 700 वस्तूंवरील…
भारत आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून तणाव बघायला मिळतोय. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. आता भारतासाठी अत्यंत वाईट बातमी येताना दिसतंय. वृत्तानुसार, अमेरिकन कंपन्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या मोठ्या शुल्काचा विस्तार करण्याची मागणी करत आहेत, जे भारतासाठी धोक्याचे आहे.
याचा परिणाम फक्त भारतच नाही तर इतर देशांवरही होऊ शकतो. या यादीत स्टीलशी संबंधित तब्बल 700 नवीन वस्तू जोडल्या जाऊ शकतात. जर असे झाले तर अनेक गोष्टींवर धक्कादायक परिणाम होऊ शकतो. अमेरिकेतील सर्व प्रकारच्या कंपन्यांकडून ही मागणी केली जात आहे. जर असे झाले तर याचा खतरनाक फटका बसण्याचे संकेत आहेत. या सर्व कंपन्यांचे म्हणणे आहे की, परदेशी वस्तूंच्या पुरवठ्यामुळे त्यांच्या देशांतर्गत बाजारपेठेचे नुकसान झाले आहे.
2024 मध्ये 1.1 कोटी सायकलींच्या आयातीदरम्यान गार्डियन बाइक्सने वाणिज्य सचिवांना दिलेल्या अर्जात स्पष्टपणे म्हटले आहे, आमचा उद्योग संपला आहे. परदेशातून स्वस्त सायकली अमेरिकन उत्पादकांना टिकून राहणे कठीण करत आहेत. फक्त ही एक सायकल कंपनीच नाही तर या सारख्या अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत, ज्या विविध उत्पादने तयार करतात. ज्यांना परदेशी स्पर्धेपासून संरक्षण करण्यासाठी सरकारने अधिक कडक उपाययोजना कराव्यात अशी इच्छा आहे.
ऑगस्टमध्ये अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियम डेरिव्हेटिव्ह उत्पादनांचा समावेश केला, ज्यावर 50 टक्के पर्यंत शुल्क लादले गेले. कंपन्यांना ही यादी वाढवण्याची इच्छा आहे. नवीन यादीत आणखी 700 वस्तूंचा समावेश होऊ शकतो. अधिक गोष्टींवर शुल्क म्हणजेच टॅरिफ लावला गेला पाहिजे, असे स्पष्ट मत अमेरिकेच्या कंपन्यांचे असल्याचे बघायला मिळतंय. ट्रम्प यांनी काही देशांवर टॅरिफ लावला आहे. मात्र, कंपन्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, इतरही अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लावावा.
अमेरिकेतून होणारी ही टॅरिफ वाढीची मागणी भारतासह चीनसाठी अत्यंत वाईट नक्कीच आहे. कारण दोन्ही देश अगोदरच अमेरिकन बाजारपेठेसाठी संघर्ष करत आहेत. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिकेत वस्तू निर्यात करणे अवघड झालेले असतानाच आता अमेरिकेतील कंपन्यांनी धक्कादायक मागणी त्यांच्या उत्पादन्नासाठी केली आहे. यामुळे हा भारतासह चीनला अत्यंत मोठा झटका नक्कीच म्हणाला लागेल.


