पुणे येथील “यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था” ला “समाज गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
गोवा दि.१० (प्रतिनिधी): शिक्षक विकास परिषद, ज्ञानदीप मंडळ, शिक्षक विकास प्रतिष्ठान गोवा आणि गोवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २९ व्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक परिषद व वार्षिक अधिवेशनाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच गोव्यातील प्राईड हॉल, रावळनाथ मंदिराजवळ, शिरोडा (गोवा) येथे उत्साहात पार पडला.
या प्रसंगी पुणे येथील यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था यांना “समाज गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. खंडूअण्णा गव्हाणे, तालुका अध्यक्ष श्री. चंद्रकांत मांढरे, उपाध्यक्ष श्री. राहुल जाधव, पुणे उपाध्यक्षा सौ. अनघलक्ष्मी दुर्गा इंदोलकर तसेच इतर पदाधिकारी यांना या सन्मानाने गौरविण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
★ डॉ. डब्ल्यू. एन. साळवे (पुणे)
★ श्री. दिनेश पवार (उपसंचालक कला व संस्कृती, गोवा)
★ श्री. सूरज के. नाईक (सामाजिक कार्यकर्ते, गोवा)
★ श्री. सीताराम नाईक (A.D.E.I. पोंडा, गोवा)
★ प्रा. डॉ. देवकर दिनेश गौर (गोधरा, गुजरात)
★ श्री. डायगो एम. दा कोस्टा (निवृत्त शिक्षण उपसंचालक, गोवा)
★ श्री. सूरज वेर्णेकर (उप. रजिस्ट्रार, कंपनी ऑप. सोसायटी, मडगाव-गोवा)
★ श्रीमती प्रफुल्ल सावंत देसाई आणि श्रीमती प्रथमा प्रभुगावकर (पुरस्कारप्राप्त शिक्षक, गोवा)
यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे आयोजन व संचालन परिषद अध्यक्ष आर. व्ही. कुलकर्णी, सचिव एम. एम. कुंभार, कोषाध्यक्ष डी. सी. खानविलकर तसेच अन्य पदाधिकारी व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.



