लोहगाव प्रतिनीधी : लोहगाव सह ९ गावाचा प्रारूप विकास आराखडा नुकताच जाहीर झाला.
या आराखडाला लोहगाव येथील चिरके कॉलनी परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे.
विकास आराखडा मध्ये चिरके कॉलनी तून जाणारा रस्ता हा ३६ मीटर (१२० फूट) लांबीचा दाखवण्यात आला आहे.
यामुळे तेथील नागरिकांनाची पक्की घरे रस्ता मध्ये बाधित होणार आहेत. नागरिक बेघर होणार आहेत.तर त्याच्या पुढच्या पिढीचे मोठे नुकसान होणार आहे.
सध्या तेथील रस्ता केवळ २० फूट रुंदीचा आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील हे लोहगाव दौरा वर असताना चिरके कॉलनी येथील नागरिकांनी त्यांची या संदर्भात भेट घेतली. आम्हाला रस्ताचा मोबदला नको तर हा रस्ता च दुसऱ्या मोकळ्या जागेतून करण्यात यावा . या प्रारूप विकास आराखडा मध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी त्यावेळी नागरिकांनी केली. व त्यासंबंधी निवदन चंद्रकांत पाटील यांना दिले.
नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी वेळ दिला जाईल . असे आश्वासन निवेदन स्वीकारताना पाटील यांनी दिले. याप्रसंगी आपल्या तीव्र भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. व मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा याप्रसंगी नागरिकांनी दिला .


