उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाने आणखी एक धक्का दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
मात्र, या यादीतून रुपाली ठोंबरे पाटील यांचे नाव वगळण्यात आले आहे. काही दिवासांपूर्वी त्यांना पक्षाने पक्षाकडून जगातील महिलांना न्याय देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी खुलासा मागण्यात आला होता. आता यादीतून थेट नाव वगळण्यात आल्याने ठोंबरे पाटील पक्षाला राम राम ठोकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षातील काही नवीन चेहरे प्रवक्ते म्हणून समोर आले आहेत. मात्र, या नव्या यादीत रूपाली ठोंबरे यांचे नाव वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातून चेतन पाटील आणि विकास पासलकर यांची प्रवक्ते पदासाठी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या नव्या यादीत प्रदेश तसेच जिल्हास्तरावरील अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून, पक्षात नवे बदल घडवून आणण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आल्याचे दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नव्याने प्रवक्ते नियुक्त
अनिल पाटील
रुपाली चाकणकर
ब्रिजमोहन श्रीवास्तव
चेतन तुपे
आनंद परांजपे
अविनाश आदिक
सना मलिक
राजलक्ष्मी भोसले
सुरज चव्हाण
हेमलता पाटील
प्रतिभा शिंदे
विकास पासलकर
राजीव साबळे
प्रशांत पवार
श्याम सनेर
सायली दळवी
शशिकांत तरंगे


