ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी- विकी जाधव
ठाणे,दि.14(जिमाका) :- जिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात कुष्ठरोग शोध अभियान मोहिमेबाबत आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ.मनिष रेंघे तसेच तालुक्यातील आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दि.17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कुष्ठरोग शोध अभियानाचा आढावा घेतला.
याप्रसंगी जिल्हा रुग्णालय कल्याण समितीची बैठक, जिल्हा एकात्मिक सोसायटी नियामक मंडळ सभा, संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती, जिल्हा जननी सुरक्षा समिती, जिल्हा सिकलसेल समिती, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती, नियमित लसीकरण समिती, 15 वित्तीय आयोग जिल्हा सनियंत्रण समिती यांचे संगणकीय सादरीकरण पाहून त्यात सूचना करुन मोहिम यशस्वी करावी, अशा जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी सूचना केल्या.



