मुख्यमंत्रिपद पक्के; भाजपची सपशेल माघार मंत्रिमंडळाचा फाॅर्म्युला ठरला…
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नितीश कुमारांपेक्षा त्यांचेकडे चार आमदार जास्त आहेत. भाजपला 89 आणि नितीश कुमारांच्या जेडीयूला 85 जागा मिळाल्या आहेत.
त्यामुळे भाजप येथे आपला मुख्यमंत्री करेल, अशी चर्चा होती. निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांचा एकनाथ शिंदें होणार असे देखील बोलले जात होते. शिंदेंच्या यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणूक लढण्यात आली. मात्र, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले.
महाराष्ट्रात जे झाले ते बिहारमध्ये होणार नसल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. बिहारच्या मंत्रिमंडळाच्या फाॅर्म्युला निश्चित झाला असून नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असणार आहेत. तर, भाजपला दोन उपमुख्यमंत्रिपदं मिळणार आहेत.
मंत्र्यांची संख्या 36 असणार असून भाजप आणि जेडीयूला समान 13 मंत्रिपदे मिळणार आहेत. तर, चिराग पासवान यांच्या वाट्याला तीन, जितनराम मांझी यांच्या पक्षाला एक आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला एक मंत्रिपद मिळणार आहे. 31 मंत्रिपदे भरली जाणार असून पाच जागा रिक्त ठेवल्या जाणार आहेत.
केंद्रातील सत्तेसाठी नितीश मुख्यमंत्रिपद?
भाजप केंद्रात स्वबळावर सत्तेत नाही. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठींब्यामुळे मोदी सरकार स्थिर आहे. नितीश कुमार यांचे 21 खासदार आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले नाही तर केंद्रातील सत्ता अस्थिर होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याचे देखील बोलले जात आहे.


