नेमकं काय झालं ?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने दोन प्रभागांमधील चार जागांवर मोठा फेरबदल केला आहे. य़ा बदलामुळे ओबीसी महिला आरक्षण आणि सर्वसाधरण महिला आरक्षण या दोन्ही प्रवर्गावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे.
या निर्णयामुळे प्रभाग 19 मधील ओबीसी महिला आरक्षण रद्द झाले असून, त्याच प्रभागातील एक सर्वसाधारण जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोडत प्रक्रिया झाली होती. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणांमुळे अनेक इच्छुकांचे गणित बिघडले. काही माजी नगरसेवकांना नवीन प्रभाग शोधण्याची वेळ आली. मात्र, सोडतीत तांत्रिक चुका राहिल्याचे आढळल्याने आयोगाने दुरुस्तीचे आदेश दिले.
प्रभाग क्र. 30 मध्ये सोडतीत ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित झालेली क जागा महिलांसाठी राखीव झाली आहे अशी ही माहिती आयोगाने दिली आहे. तर याच प्रभागातील जागा ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती. ओबीसी जागेवर एक जागा महिला आरक्षित झाली. निमयमांनुसार, ज्या प्रभागांमध्ये एससी आणि एसटी प्रवर्गाच्या जागा आहेत आणि त्या महिलांसाठी आरक्षित नाहीत, तेथे ओबीसी प्रवर्गातील जागा महिलांसाठी राखून ठेवण्याची तरतूद आहेत.
आरक्षण सोडतीत राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या सुधारणा जाहीर झाल्यानंतर Prabhag No.19 आणि Prabhag No.30 मधील जागांचे नव्याने आरक्षण निश्चित झाले आहे.
Prabhag No.19 – उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, पिंपरी कॅम्प
नवीन आरक्षण असे निश्चित झाले:
अ – एससी (महिला)
ब – ओबीसी
क – जर्नरल (महिला)
ड – जर्नरल
Prabhag No.30 – दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी
अ – एससी
ब – एसटी (महिला)
क – ओबीसी (महिला)
ड – जर्नरल


