पक्षात सुनील केदारांची हुकूमशाही; बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम…
नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसची गटबाजी थांबण्याचे नाव घेत नाही. अशातचआता वाडी नगरपरिषदेत शहर अध्यक्ष शैलेश थोराने यांना पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची तिकीट नाकारताच शैलेश थोराने सहा 120 कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला य . यात नागपूर तालुका अध्यक्ष प्रकार कोकाटे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव काँग्रेसचे अनिल पाटील यांचा समावेश आहे.
आपण सुनील केदार यांच्या हुकूमशाही धोरणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेसला पाठवलेल्या पत्रात सांगितलय. त्यामुळेदिवसागणिकनागपूरकाँग्रेसमध्येनाराजीचासूरवाढतअसूनहिगळतीरोखानेआताकाँग्रेस नेतृत्वापुढचंआव्हानअसणारआहे
नागपूरकाँग्रेसमध्येनाराजीचासूर, गळती रोखाने पक्ष नेतृत्वापुढचं आव्हान
राज्यातसध्यास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचेवारेवाहतआहे. अशातचऐननिवडणुकीच्यातोंडावर नागपूर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरुअसल्याचेचित्रआहे. साध्य नागपूर ग्रामीण काँग्रेसमध्येमोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र व पक्षांतर सत्र सुरु असून याला काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या मनमर्जी कारभाराला जबाबदार धरले जात आहे. धक्कादायक म्हणजे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून घेत ज्या प्रेम झाडे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, त्याच प्रेम झाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून देखील वाडीच्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला आहे. त्यामुळेया नाराजीनाट्यालाथांबवण्यासाठी काँग्रेस नेतृत्वकाहीपाऊलेआताउचलतातकाहेपाहणेमहत्वाचेठरणारआहे
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सुनील केदारांवररोष, शिस्तभंगाची कारवाई होणार?
सध्या नागपूर जिल्ह्यात माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाला घेऊन प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. सुनील केदार यांच्या भेदभावपूर्ण वागणुकीमुळे मोठ्यासंख्येने काँग्रेसचे पदाधिकारी पक्षाच्या सदस्यपदाचे राजिनामे देत आहे. राजीनामे देतांना प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुनील केदारची यांची तक्रार करत हे राजीनामे देत आहे. आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभेत काँग्रेस कार्यकारणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दोन दिवसाआधी कामठी विधासभेतील मोठा चेहरा व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रसन्ना तिडके यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सर्वाचेखापर त्यांनी सुनील केदार यांच्यावर फोडलं आहे. त्यामुळे पुढील काळात सुनील केदार यांच्या पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सुनील केदार यांच्या काय रोष आहे.


