ज्यांच्या कन्येच्या लग्नात ट्रम्पचे चिरंजीव ते जेनिफर लोपेजना आमंत्रण…
भारतात श्रीमंत घरातील लग्न केवळ दोन जीवांचे मिलन नाही तर वैभव आणि शक्ती प्रदर्शनाचा मार्ग बनला आहे. नुकतेच अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या भव्य लग्न सोहळ्याच्या बातम्यांनी बातम्यांचे विश्व व्यापलं होते.
आता उदयपुरात अशा एका महाविवाह सोहळ्याची तयारी सुरु आहे. हे लग्न इतके भव्य आहे की याची चर्चा थेट व्हाईट हाऊस ते हॉलीवूडपर्यंत सुरु आहे. आपण बोलत आहोत अमेरिकेचे दिग्गज फार्मा व्यापारी राजू मंटेना यांची कन्या नेत्रा मंटेना आणि वामसी गदिराजू यांच्या लग्नाची. या लग्न सोहळा २१ नोव्हेंबर पासून २४ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.
उदयपुर बनले ग्लोबल हॉटस्पॉट
राजस्थानच्या उदयपूरचा सिटी पॅलेस आणि जगमंदिर आयलँड पॅलेस या वेळी जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणात बदलले आहे. या लग्नातील पाहुण्याची यादी पाहूणे कोणाचेही डोळे विस्फारतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चिरंजीव डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर या सोहळ्याचा एक भाग होण्यासाठी भारतात आले आहेत. त्यांच्या सुरक्षा आणि प्रोटोकॉलमुळे संपूर्ण शहराची सुरक्षा कडेकोट केली आहे.
सायंकाळी या विवाह सोहळ्याला खरी रंगत येणार आहे. या सोहळ्याला मनोरंजन जगातील दोन मोठ्या हस्ती जेनिफर लोपेज आणि जस्टीन बिबर यांच्या संगीताची मैफील रंगणार आहे. लग्नात डीजे वाजला तरी सामान्य लोक खुष होतात. येथे इंटरनॅशनल स्टार परफॉर्म करणार आहेत.या लग्नात जगमंदिर द्वीपवर अत्याधुनिक व्हीज्युअल आणि साऊंड सिस्टीम सह इंटरनॅशनल कॉन्सर्ट सारखा माहोल तयार झाला आहे. बॉलीवूडचे अनेक सितारे यात सहभागी होणार आहे.
कोण आहे राजू मंटेना?
एवढी तयारी पाहून तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की अखेर राजू मंटेना कोण आहेत ? राजू मंटेना भारतीय अमेरिकन समुदायात एक महत्वाचे व्यक्तीमत्व आहे. त्यांचे शिक्षण भारतातील जेएनयूमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेला जाऊन फार्मेसीच्या जगात प्रवेश केला आहे. आज ते ‘Ingenus Pharmaceuticals’ ते चेअरमन आणि सीईओ आहेत. ही कंपनी अमेरिकेत स्वस्त आणि सुलभ पद्धतीने औषधे निर्मितीसाठी ओळखली जाते.
फ्लोरिडा येथील ‘Integra Connect’ चे देखील ते संस्थापक आहेत, जी हेल्थकेअरला डिजिटाईज करण्याचे काम करते. म्हणजे अमेरिकेतील रुग्णालयात डॉक्टरांच्या काम करण्याच्या तंत्रात जो बदल झाला आहे. त्यात मंटेना यांचा मोठा हाथ आहे.मंटेना जरी अमेरिकेत स्थायिक झाले असले तरी त्यांचे हृदय अजूनही भारतासाठी धडधडते. त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी उदयपूरची निवड त्यासाठीच केली आहे.
राजू मंटेना केवळ कमाईसाठीच नव्हे तर त्यांच्या खर्च करण्याच्या अंदाज आणि दानशुरतेसाठी देखील प्रसिद्ध आहेत. त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज यावरुन तुम्ही लावू शकता की २०२३ मध्ये त्यांनी फ्लोरिडा येथील मॅनालापॅन येथे सुमारे ४०० कोटी रुपयांचा एक लक्झरी एस्टेट खरेदी केला होता. १६ बेडरुमच्या या घरात प्रायव्हेट बिच आणि घोडेस्वारी अशा सुविधा आहेत.
इतके श्रीमंत असूनही ते त्यांचे मुळ आणि संस्कार विसरलेले नाहीत. साल २०१७ मध्ये ते चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांना तिरुपती बालाजी मंदिराला २८ किलो सोन्याने तयार केलेली ‘सहस्रनाम माला’ दान केली होती. त्यावेळी यो सोन्याच्या माळेची किंमत सुमारे ८.३६ कोटी रुपये होती.


