ओवेसींची CM नितीश यांना खुली ऑफर !
अमरोहा येथे एका सभेला संबोधित करताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (@asadowaisi) म्हणाले, आम्ही आमच्या पाचही आमदारांसाठी पक्ष कार्यालये उघडू आणि ते आठवड्यातून दोनदा त्या कार्यालयात बसून लोकांशी संवाद साधतील.
आम्ही सहा महिन्यांत हे काम सुरू करण्याचा प्रयत्न करू. मी सहा महिन्यांतून एकदा भेट देण्याचा प्रयत्न करेन… आम्ही नवीन बिहार सरकारचे अभिनंदन करतो. आम्ही त्यांच्याशी सहकार्य करण्यास तयार आहोत, परंतु सीमांचलला न्याय मिळाला पाहिजे.


