गुलाबराव पाटलांच्या उत्तराने अनेक प्रश्न उपस्थित…
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा होती.
या नाराजीचे कारण म्हणजे भाजपा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचे राजकारण. याचवरुन एकनाथ शिंदे हे नाराज आहे अशा जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान त्यांनी दिल्लीवारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली होती.
मात्र एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत की या नुसत्या चर्चा आहेत, यावर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे. नाशिकमधील भगूर येथे शिंदे गटाच्या उमेदवार अनिता विजय करंजकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीबद्दल विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी सूचक उत्तर दिले.
गुलाबराव पाटलांचे सूचक वक्तव्य
ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, शिवसेना आपल्या पद्धतीने लढत आहे. काँग्रेसपासून आम्ही हाच त्रास सहन करत आलो आहोत, लढत गेलो, चालणाऱ्याला भीती नसते. त्रास आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे, आमचा आम्हालाच त्रास आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
गुलाबराव पाटील यांच्या या उत्तरामुळे महायुतीमध्ये असूनही शिंदे गटाला वारंवार जुळवून घ्यावे करावे लागत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘आमचा आम्हालाच त्रास आहे’ या त्यांच्या विधानाने हे महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक अधोरेखित केले आहेत.
अजित पवार गटावर थेट टीका
यावेळी गुलाबराव पाटील यांनी केवळ शिंदे यांच्या नाराजीवर भाष्य केले नाही, तर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक आमदार सरोज आहिरे यांच्यावरही टीका केली. भगूर येथील पाणीपुरवठा योजना शिंदे गटाने सुरू केली, पण अजित पवार गटाचे नेते याचे श्रेय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.


