सून एश्वर्याची अवस्था पाहून हळहळले अमिताभ बच्चन !
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या मुलाखती आणि सोशल मीडियावर व्यक्त होण्याबद्दल नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान गेल्या काही वर्षभरापासून बच्चन परिवारात वाद असल्याचं बोललं जात होतं.
तसेच ऐश्वर्याबद्दल बच्चन कुटुंब नाराज असल्याचं बोललं जात होतं.पण अशातच आता अमिताभ यांचा मुलाखतीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ते सून एश्वर्याबद्दल खूप हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत.
अमिताभ यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल
अमिताभ यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात अमिताभ बच्चन यांनी त्यांची नात आराध्याच्या जन्माशी संबंधित एक अतिशय वैयक्तिक किस्सा शेअर केला. त्यांनी ऐश्वर्याच्या धाडसाचे आणि तिच्या हिंमतीचे कौतुक केले. अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याच्या नॉर्मल डिलिव्हरीबद्दल सांगितले.
ऐश्वर्याने त्या वेदना सहन केल्या
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केले आणि २०११ मध्ये त्यांची मुलगी आराध्या हिचा जन्म झाला. आराध्या आता 14 वर्षांची आहे आणि तिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. आराध्याच्या जन्मानंतर काही दिवसांनी बच्चन कुटुंबाने माध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला होता की ऐश्वर्याने नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा पर्याय निवडला होता. आणि वेदना कमी करण्यासाठी तिने कोणतेही वेदनाशामक किंवा एपिड्युरल वापरले नव्हते.
ऐश्वर्याच्या मानसिक आणि शारीरिक ताकदीचे कौतुक केले
अमिताभ बच्चन यांनी त्यावेळेसचा एक किस्सा सांगताना म्हटले होते की, ” ऐश्वर्याला सुमारे 2-3 तास प्रसूती वेदना होत होत्या, पण तरीही तिने सामान्य प्रसूतीचाच आग्रह धरला होता. तिने या दोन ते तिन तासात खूप वेदना सहन केल्या आहेत.” त्यांच्या या खुलाशामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्याच्या मानसिक आणि शारीरिक ताकदीचे कौतुक झाले. 2011 मध्ये ऐश्वर्याचे धाडस स्पष्ट झाले. अमिताभ बच्चन नेहमीच ऐश्वर्याला बऱ्याच समस्यांपासून बचाव करत राहिले आहेत.
ऐश्वर्या कधीही आई होऊ शकत नाही…’
एकदा 2010 मध्ये जेव्हा एका वृत्ताने ऐश्वर्या कधीही आई होऊ शकत नाही असा खोटा अहवाल प्रकाशित केला होता. तेव्हा हे वाचून अमिताभ बच्चन संतापले होते आणि त्यांनी लगेचच त्यांच्या ब्लॉगवर एक लांबलचक पोस्ट लिहिली ज्यामध्ये या वृत्तावर जोरदार टीकाही केली. त्यांनी लिहिले की, “ही बातमी पूर्णपणे खोटी, बनावट आणि अत्यंत वाईट पत्रकारिता आहे.”
अमिताभ बच्चन ऐश्वर्याला त्यांची मुलगी म्हणतात
अमिताभ बच्चन यांच्या शब्दांतून त्यांचा राग स्पष्टपणे दिसून येत होता. त्यांनी कठोरपणे लिहिले की, “मी माझ्या कुटुंबाचा प्रमुख आहे. ऐश्वर्या माझी सून नाही, तर माझ्या मुलीसारखी आहे.” त्यांनी असा इशाराही दिला की जर कोणी त्यांच्या कुटुंबाबद्दल नकारात्मक किंवा अनादरपूर्ण बोलले तर ते पूर्ण ताकदीने उत्तर देतील.


