उर्दू भाषेवर निस्सिम प्रेम करणाऱ्या सचिन पिळगावकरांना नानांचा टोला?
अभिनेते सचिन पिळगावकर हे त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सचिन पिळगावकर यांनी इंडस्ट्रीमध्ये अगदी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केलेली. केवळ मराठी पुरतच मर्यादित न राहता त्यांनी बॉलीवूडमध्ये सुद्धा उत्तम नाव कमावले.
त्यामुळेच त्यांना वेगवेगळ्या भाषांमधल्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव आहे. या कलाकारांसोबत काम करताना त्यांच्यासोबत त्यांच्या बऱ्याच आठवणी सुद्धा निर्माण झालेल्या. त्यामुळे ते याबाबत दरवेळी व्यक्त होत असतात.
एकदा एका कार्यक्रमामध्ये त्यांनी अभिनेत्री मीनाकुमारी यांनी उर्दू भाषा शिकवल्याचे सांगितलेले. सचिन पिळगावकर हे बरेचदा शेर शायरी करतात, उर्दू गझली गातात. ही जोडी त्यांना मीनाकुमारी यांच्यामुळे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले. एका कार्यक्रमात उर्दू भाषेबद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांची मातृभाषा जरी मराठी असले तरीही ते विचार उर्दू भाषेतूनच करतात. त्यांचे हे विधान प्रचंड व्हायरल झालेले.
ते पुढे म्हणाले की, माझी मातृभाषा मराठी आहे पण मी विचार उर्दू भाषेतून करतो. मला जर माझी बायको किंवा इतर कोणीही रात्री 3 वाजता जरी उठवलं तरीही मी उर्दू भाषेतूनच बोलून जागा होतो. मी केवळ उर्दू भाषेतून जागा होत नाही तर त्या भाषेत झोपतो ही. माझी उर्दू भाषा ही माझ्या बायकोला सवत म्हणून आवडते. माझा त्या भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडतं…. सचिन पिळगावकर यांचे हे विधान प्रचंड व्हायरल झालेले. त्यावरून त्यांना काही जणांनी ट्रोल सुद्धा केलेले.
अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्यामध्ये ते मराठी भाषेबद्दल बोलत आहेत. पण त्यावरून नानांचे भाषेवरून सचिन पिळगावकर यांना टोला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाना एका कार्यक्रमात म्हणत आहेत की, मराठी मध्ये बोलताना कसं असतं की तुम्हाला वेगळे शब्द शोधावे लागत नाहीत. ते सहज येतात, पटकन तोंडी येतात कारण मला स्वप्न ही मराठीमध्ये पडतात. कारण ती माझी मातृभाषा आहे. नानांच्या या विधानावर त्यांचे चाहते खूप खुश असून त्यांचे खूप कौतुक होत आहे.


