समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर :- ( जैतापुर) :- तालुक्यातील उप विभाग अनसुरे मध्ये ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि शिवसेना लांजा-राजापूर-साखरपा चे लोकप्रिय आमदार सन्मा.किरण ( भैया) सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपविभाग अनसुरे व शिवसैनिक समिर विजय शिरवडकर यांच्या सौजन्याने दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत होळी स्टॉप ( माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र कार्यालय होळी जैतापुर ) येथे मोफत नेत्र तपासणीशिबीर आयोजित केले आहे.
या शिबिराला दृष्टी हॉस्पिटलचे डॉ. अभिजीत मिसळ याचे तर त्यांच्यासोबत आकाश जाधव
अनिकेत मलकापुरे यांचे सहकार्य लभणार आहे.तरी या उपयुक्त अश्या शिबिराचा लाभ घ्यावा ,असे अवाहन श्रीकृष्ण राऊत, आणि संदिप चव्हाण यांनी केले आहे.


