■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर :- ( चिरेखान ) :- तालुक्यातील राजापूर हातीवले मार्गावरील चिरेखान येथें दि.२७ नोहे.२५ ला दोन गाई मृत अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. हा अपघात रात्री किव्हा पहाटे झाला असावा असे समजते. कारण रात्री मोठ्या मोठया गाड्यांची वाहतूक नेहमीच सुरू असते,मोठं मोठाले ट्रक, कंटेनर यांची वाहतूक ही बहूदा रात्रीच होते.त्यामुळे याच्याच धडकेत या निष्पाप गुरांचा अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्य झाला असावा.
काही महिन्यांपूर्वी मोकाट गुरांसाठी आणि त्यांच्या मालकांवर अंकुश आणण्यासाठी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यानी अनेक निवेदन दिली होती,गुरांचा या समस्येवर कायमची उपाययोजना करावी अशी मागणी केली होती. त्या संदर्भात गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,पोलिस निरीक्षक,आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांकडे निवेदने दिली होती.परंतू, आज पुन्हा तेच होऊन मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शासन या मोकाट गुरे आणि त्यांच्या मालकांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष आहे.


