■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर:- ( जैतापुर) :- ग्रामीण भागातील नाट्य कलेमधून अतिशय खडतर परिस्थितीतून उदयाला आलेला एक जैतापूरचा नाट्य क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणजे मास्टर सुनील नेताजी करगुटकर.
शालेय जीवनापासून कलेची प्रचंड आवड असणारा हा कलाकार त्यावेळी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आवडीने अनेक कार्यक्रम करायचा, अतिशय सुंदर अशी मिमिक्री हे त्याच्या कलेचे वैशिट्य होते. शालेय जीवनात अनेक सार्वजनिक कार्यक्रमात व छोट्या मोठ्या नाट्य कलेत त्याने अनेक भूमिका वठवल्या,आणि त्या गाजल्या सुध्दा त्याने वाठवलेली चेटकीण व साईबाबा यांच्या भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून बसली आहे.
असा हा हरहुन्नरी कलाकार पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर चमकला तो म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अतिशय गाजलेल्या “मी शिवाजी राजे भोसले बोलतोय ” या सिनेमात, त्यानंतर त्याने मागे न वळता वस्त्रहरण, वडाची सालं पिंपळाक, इत्यादीं सारखी अनेक व्यावसायिक नाटके, क्राईम डायरी, रात्रीस खेळ चाले सारखी टीव्ही मालिक, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, बेधडक इत्यादींसारखे अनेक मराठी सिनेमांमधून काम केले, येत्या २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मास्टर सुनील करगुटकर यांची भूमिका असलेला नवीन पहिला- वहीला फकिरीयत नावाचा हिंदी सिनेमा महाराष्ट्र आणि देशभरात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यामध्ये गुरूमाई, दिपा परब-चौधरी, उदय टिकेकर, संतोष जुवेकर, विनित शर्मा, अक्षय वर्तक, संदेश जाधव, नुपूर , नयन जाधव, अनुप्रिता वर्तक इत्यादींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेतच या सिनेमाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे.
या सिनेमातील भूमिकेबद्दल सर्वांचं प्रचंड उत्सुकता आहे त्यामुळे या सिनेमाला आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा आवाहन मास्टर सुनील करगुटकर यांच्या मित्रमंडळींकडून करण्यात येत आहे. व समस्त जैतापूर वासिय त्यांचे मनःपूर्वक कौतुक करीत आहेत.


