स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळ राज्यातील राजकारण तापलंय. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर नवीन युती बनत आहेत. तर काही ठिकाणी बनलेली युतीत फूट पडत आहे. काही ठिकाणी तर कट्टर विरोधात असलेल्या पक्षातील नेते एकत्र येत युती करत आहेत. आता सोलपुरातमधीलच उदाहरण घ्या, येथे शरद पवार आणि एकनाथ शिंदे गटाची युती झालीय. कुर्डूवाडीतील झालेली युती स्थानिक निवडणुकांसाठी झालीय.
मात्र त्यामुळे भविष्यात राज्यात मोठा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबत झालेली आमची युती महाराष्ट्राच्या भविष्यातील नांदी देखील ठरू शकते, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलय. म्हणजेच काय तर पुढे भविष्यात राज्यातील इतर ठिकाणी सु्द्धा शरद पवार गट आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. कुर्डूवाडी नगरपालिकेच्या प्रचार सभेत बोलताना शिंदे यांनी हे युतीचं विधान केलंय. मात्र त्यांच्या या विधानामुळे महायुतीचं टेन्शन वाढलंय.
भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादावादीतून राज्यातील नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी शिंदे गटाने भाजपच्या विरोधात विरोधीपक्षांशी आघाडी केलीय. अशाच पद्धतीने भाजपनेही शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. सोलापूरच्या निवडणुकांमध्ये दररोज मोठ्या घडामोडी घडत आहेत.
अनगर, सांगोला अशा नगरपालिकेतील भाजपच्या भूमिकेवरून शंशिकांत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे यांनी निशाणा साधला. काही लोक हे फक्त फायद्यासाठी वापर करतात आणि नंतर सोडून देतात. असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.
एकनाथ शिंदे यांचा फक्त वापर झाला आहे. आपण सर्व साधी माणसे आहोत. पण लढणारी माणसे कधीच शरणागती घेत नाहीत. कुर्डूवाडी येथे झालेली युती ही भविष्यातील नांदी सुद्धा असू शकेल, असं शंशिकांत शिंदे म्हणालेत. भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी कुर्डूवाडी येथे शिंदे सेना आणि शरद पवार गट यांच्या युतीबाबत मोठं विधान केलंय.


