ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा- ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती क्षेत्रात नव्याने होत असलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधात व काही बिल्डरांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या होत असलेल्या फसवणुकी विरोधात बहुजन समाज पार्टी चे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णाताई कांबळे यांचे कडून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
आजपासून दिवा प्रभाग समिती समोर सुरू करण्यातआलेल्या ह्या आमरण उपोषणास ठाणे जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा कांबळे यांच्या समवेत कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख दीपक खंदारे, सुरेखा माने, अपर्णाताई सकपाळ, वर्षा कदम, शंकर पोळ यांच्यासह बसपाचे ईतर पदाधिकारी कार्यकर्ते यानीं उपोषणास सुरुवात केली.
आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तसेच फसवणूक झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही तोवर हे उपोषण मागे घेतले जाणार नाही- सुवर्णाताई कांबळे (ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्षा)
