ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा- दिवा शहरातील नाईक नगर येथील अवघ्या पाच वर्ष जुन्या “स्वामी समर्थ कृपा अपार्टमेंट” च्या पहिल्या मजल्यावरचा इमारतीचा स्लॅब सकाळी ६ वाजता कोसळला असून ज्यामध्ये उषा संजय पवार (आई), स्नेहा संजय पवार (मुलगी) आणि नेहा संजय पवार (मुलगी) या झोपेत असतानाच अचानक स्लॅब कोसळल्याने पवार कुटुंबियांतील या माय-लेकी गंभीर जखमी झाल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे.
त्यांना सध्या दळवी नगर येथील मानव कल्याण हॉस्पिटल येथे प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
