प्रतिनिधी/ स्वाती हडकर
चिपळूण–खेर्डी जिल्हा परिषद गटात भाजप–सेना युतीच्या सौ. रावी मोरे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले. मतमोजणीच्या १३व्या फेरीनंतरही त्यांची आघाडी कायम राहिली होती.
दरम्यान, पेढे पंचायत समिती गणातून शिवसेनेचे संदेश बापू आयरे यांनी सुमारे ४०० मतांची आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. तसेच खेर्डी पंचायत समिती गणातून भाजपचे विनोद भुरण यांनी विजय मिळवला, तर चिपळूण–खेर्डी परिसरात भाजप–सेना युतीचा प्रभाव अधोरेखित झाला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
