■ समिर शिरवडकर-रत्नागिरी
राजापूर :- ( दळे) :- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदार आदरणीय श्री नारायणराव राणे साहेब यांच्या निधी मधून “दळे ग्रुप ग्रामपंचायत”अंतर्गत सोलर लाईट बसविणे हे काम मंजूर करण्यात आलं होत.त्या कामाचा निधी ५ लाख रुपये असून त्या मद्ये २२ सोलर लाईट बसविण्यात आल्या आहेत.
या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते जब्बार काझी यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ यांच्या मधून समाधान व्यक्त केलं जात आहे.
खासदार राणे साहेब यांनी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल,तसेच त्यांचे स्विय सहाय्यक श्री योगेश मगदूम यांचे जब्बार काझी आणि ग्रामस्थ यांनी राणे साहेबांचे आभार मानले आहेत..!!
