दौडं तालुका प्रतिनिधी -अंकुश काळे
दौंड तालुका गणित अध्यापक संघ यांनी आयोजित केलेल्या PTS परीक्षा 2025 प्रमाणपत्र व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षीयभाषणात पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसंपादक श्री रामचंद नातू सर यांनी ज्याचे अभ्यासातील गणित चुकले, त्याचे आयुष्याचे गणित चुकले असे आव्हान विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री प्रसाद गायकवाड सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संपादक श्री रामचंद नातू सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी सहसंपादक श्री विनायक सुंबे सर,दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री उत्तम जावळे सर, पुणे जिल्हा गणित अध्यापक संघाचे प्रतिनिधी श्री रत्नाकर भिसे सर, सरस्वती विद्यालय रावणगाव चे मुख्याध्यापक श्री दत्तू इवरे सर, जिजामाता विद्यालयाचे सहशिक्षक श्री गणेश लोणकर (चांडाळ चौकटी सिरीयल अभिनेते) , दौंड गणित अध्यापक संघाचे सदस्य ,विविध शाळांतील विद्यार्थी व पालक तसेच इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी श्री प्रसाद गायकवाड सर, श्री रामचंद नातू सर, श्री उत्तम जावळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच श्री अभिनव सिंग (करिअर मार्गदर्शक) यांनी उत्कृष्ट करिअर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, क्रिएटिव्ह कॉम्प्युटरचे संचालक श्री उल्हास मिसळ सर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मेडल तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना नाष्टा देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री संजय आढाव सर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बाबासो सांगळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दौंड तालुक्यातील सर्व गणित अध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
