ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा- धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे व सौ.अश्विनी केंद्रे यांच्या पुढाकाराने काही महिन्यां पूर्वीच उभारण्यात आलेल्या मुंब्रादेवी कॉलनी स्थीत शिव-साई सार्वजनिक महादेव मंदिर याच्या जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला होता. त्या नंतर आलेला महाशिवरात्रीचा हा पाहिला वहिला सोहळा असून मोठ्या संख्येने येथे शिवभक्त भाविक दर्शनासाठी लांब च्या लांब रांगा लावलेले पहायला मिळाले. 
यावेळी आयोजकांकडून सर्व भाविकांसाठी अल्प-उपहार (खिचडी) ची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली असून सकाळ पासून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला असून शांतीपूर्ण व भक्तिमय वातावरणात महाशिवरात्रीचा कार्यक्रम सुरू आहे.

