दै. चालु वार्ता, पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): एमआयडीसी पैठण परिसरातील मुधलवाडी येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिमय वातावरणात पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. धनकनकेश्वर महादेव मंदिर संस्थान यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सकाळी अकरा वाजता धनकनकेश्वर महादेव मंदिरात झालेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष व नगरसेवक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. संदीप शिरवत व डॉ. ईश्वर भुजबळ, आदर्श शिक्षक म्हणून संतोष वडनेरे व आबासाहेब कनसे, उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पैठण पंचायत समितीच्या वैशाली राहुल साळवे, यशस्वी उद्योजक म्हणून राजेंद्र भालेराव व प्रविण धस, आदर्श शेतकरी म्हणून राजेंद्र बोबडे व बद्रीनाथ पाचोडे, तसेच आदर्श पत्रकार म्हणून अनिल जाधव यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, तालुकाप्रमुख आण्णासाहेब लबडे, जिल्हा दूध संघाचे संचालक नंदू काळे, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या सन्मान सोहळ्यामुळे धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली. समाजातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देण्याचे कार्य मंदिर संस्थानच्या माध्यमातून करण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
