दै. चालू वार्ता वृत्तसेवा वर्धा – उपसंपादक-अवधूत शेंद्रे
वर्धा – आष्टी :- येथील जिल्हा परिषद इंदिरा गांधी प्राथमिक शाळेच्या वतीने बक्षीस वितरण व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सव्वालाखे मंगल कार्यालय आष्टी येथे करण्यात आले होते कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना स्व. इंदिराबाई बगुलकर व स्व. विठ्ठलराव बगुलकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ तसेच प्रशांत ठाकरे सुजातपूर यांच्यातर्फे प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आनंद सव्वालाखे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तसेच प्रमुख पाहुणे प्रशांत ठाकरे अध्यक्ष तालुका कृषी विभाग आष्टी (आत्मा) व सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव जवळेकर व शरद बगुलकर नितेश चातुरकर उपाध्यक्ष हे होते कार्यक्रमाचे संचालन कु.बसंती बगुलकर व प्रास्तविक राजू चौरेवार यांनी तर मुख्याध्यापक वसुले यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळेच्या शिक्षिका स्नेहा हिरुडकर व सर्व पालकांचे सहकार्य लाभले.
