दै. चालू वार्ता वृत्तसेवा वर्धा – उपसंपादक-अवधूत शेंद्रे
—————————————
वर्धा :-विदयार्थीनीना सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा अंतर्गत, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वर्धा व राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा व जिवन कौशल्य प्रशिक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी विद्यालय, वर्धा येथे कराटे प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन नुकतेच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी डॉ धर्मपाल कुंभरे,तर उदघाटक म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका विना सहारे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संदीप मांडवकर जिल्हा समन्वयक जिल्हापरिषद वर्धा केंद्रप्रमुख कांबळे उपस्थित होते. ग्रामीण भागातील मुलीमध्ये निर्भयता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमाची अत्यंत गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरानीं व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन विजया सुकळकर यांनी केले कार्यक्रमाला शाळेच्या विद्यार्थिनी विद्यार्थी उपस्थित होते
