प्रतिनीधी जीवन जाधव
औसा
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई,क्रीडा भारती महाराष्ट्र प्रदेश,मॉडर्न व्यायाम शाळा व सांस्कृतिक क्रीडा मंडळ अंबड तालुका अंबड,जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने अंबड येथे आयोजित राज्यस्तरीय सूर्यनमस्कार शिक्षक प्रशिक्षण (TOT) व स्पर्धा रथसप्तमी 2026 निमित्त संपन्न झाल्या.या प्रशिक्षणासाठी व स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकूण 408 शिक्षकांनी नोंदणी केलेली होती.यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून एक योगा/क्रीडा शिक्षकांना राज्यस्तरीय मास्टर ट्रेनिंग देण्यात आली.त्यानंतर सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील श्री नेताजी माणिकराव सावंत (सहशिक्षक)श्रीराम माध्यमिक विद्यालय एरंडी सारोळा ता.औसा,जि. लातूर तथा औसा पतंजली योग समिती तालुकाध्यक्ष यांनी उत्कृष्ट सूर्यनमस्कार करून राज्यातील सर्व स्पर्धकावर दणदणीत मात करून लातूर जिल्ह्याला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ लातूरच्या कर्तव्यदक्ष सचिव आदरनिय महोदया अनुपमा भंडारी मॅडम यांनी श्री नेताजी सावंत सरांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून सन्मानित केले.
यापूर्वी आदरनिय भंडारी मॅडम औसा पंचायत समिती येथे गटशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना श्री नेताजी सावंत यांची आंतरराष्ट्रीय योग दिनाकरिता औसा तालुक्यातील सर्व शिक्षकांना योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी औसा तालुका समन्वयक (साधनव्यक्ति)म्हणून नियुक्ती केल्या होत्या. तेव्हापासून आजतागायत नेताजी सावंत सर हेच औसा तालुका समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.
तसेच तीन जिल्ह्यांच्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अनुपमाजी भंडारी मॅडम यांचाही यथोचित सत्कार हनुमान विद्यालय शिवलीचे माजी मुख्याध्यापक संदिपानजी माळी सरांनी शाल,श्रीफळ देऊन व फेटा बांधून केले.
या सत्कार प्रसंगी,केतन पाटील,प्रा.भगवान शिंदे,प्रा. प्रताप शिंदे.प्रा.शिंदे डी.व्ही.ढमाले साहेब, जमादार साहेब आणि कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गतवर्षी आणि याही वर्षी सलग दोन वर्षे नेताजी सावंत सरांनी राज्यस्तरीय सुवर्णपदक पटकावलेबद्दल सर्वांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
