दैनिक चालू वार्ता वैजापूर तालुका प्रतिनिधी- श्री अनिल सूर्यवंशी
वैजापूर तालुक्यातील मराठा सेवक श्री प्रशांत पाटील सदाफळ यांनी आज मराठा भवन उभारण्यासाठी नगर परिषदेच्या हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याबाबत नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री दिनेश भाऊ परदेशी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
नगरपरिषदेच्या परिसर हद्दीत मराठा समाजाची संख्या लक्षणीय आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक , सामाजिक, वैवाहिक कार्यक्रमसाठी मराठा भवन उपलब्ध नाही त्यामुळे या समाजाला अनेक अडचणी येतात.
त्यासाठी नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकळी जागा मराठा भवनासाठी उपलब्ध करून द्यावी, आणि तिथे नियमानुसार मराठा भवन बांधकाम करण्यात येईल.
यावेळी तालुक्यातील जवळपास 35 मराठा बांधव यावेळेस उपस्थित होते.
