दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे
चार दिवसीय शिव जन्मोत्सव सोहळा देगलूर 2026 चे उदघाटन व रक्तदान शिबिराचा 16/02/2026 रोजी सकाळी 10:30 वाजता उदघाटक आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते डॉ.
मयुर कद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुजन दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला .
यावेळी शिवाजीराव देशमुख बळेगावकर शंकरराव कन्तेवार अँड प्रितम देशमुख लक्ष्मीकांतजी पदम्वार , बालाजी पाटील थडके जनार्दन बिरादार प्रशांत दासरवाड मिलिंद बिरकंगन शिवजन्मोत्सव अध्यक्ष नामदेव पाटील थडके यांच्या सह अँड अंकुश राजे जाधव खालिद पटेल गजानन पाटील राजु देशमुख ढोसनीकर डॉ सुनील जाधव बालाजी पाटील जाधव संजय कांबळे असलम शेख विट्ठलराव भोसले प्रा दिलीप भडके संतोष जाधव माधव पाटील संदीप शिंदे आदी शिव जन्मोत्सव समिति चे पदाधिकारी यांच्या सह जेजेराव पाटील शिंदे सुधाकर पाटील शहाजी बाबरे सुर्यकांत येलबुगडे उमाकांत भुताळे नवनाथ पाटील श्रिनिवासा रक्त संकलन केंद्र देगलूर चे डॉ किरण बिरादार डॉ प्रणिता बिरादार सुरेश देशमुख व सर्व कर्मचारी यांच्या सह सर्व शिव प्रेमी यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती . प्रमुख पाहुण्याचा शिव स्मारक प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला . आमदार जितेश भाऊ यांनी लोककल्याणकारी उपक्रम राबवून आदर्श जीवन वाचवण्याचे काम सामाजिक बांधिलकी जपून करण्यात आली हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन केले .
सुत्र संचलन डॉ. सुनील जाधव यांनी केले . आभार अँड अंकुश राजे जाधव यांनी मांडले . यावेळी उदघाटन सोहळ्या नंतर शिव प्रेमी महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदवत 115 जनांनी रक्त दान केले अशी माहिती अध्यक्ष नामदेव पाटील थडके यांनी दिली . सहभागी रक्त दात्यांना सहभाग प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले . दुपारी दोन वाजता रांगोळी स्पर्धेचे उदघाटन श्वेता बसवराज पाटील हस्ते विट्ठलराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाले यावेळी संजीवनी ताई सुर्यवंशी शिला ताई देसाई यांनी परीक्षक म्हणुन पदभार पहिला सुरेखा लोणे महागावे ताई भोसले ताई यांची प्रमुख उपस्थिती होती . शालेय सातवी पर्यंत विद्यार्थ्यानी आठवी ते दहावी व दहावी पुढील खुला गटात सहभाग नोंदवला या तीन गटात प्रथम द्वितीय त्रुतिय विजेत्यांना ट्रॉफी व विजेता प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले .सहभागी सर्वाना सहभाग प्रमाण पत्र देण्यात आले . अध्यक्ष नामदेव पाटील थडके व सर्व शिव जन्मोत्सव समिति 2026 समिति यांनी उपक्रम यशस्वी केले .
