अमरावती (प्रतिनिधी)- संजय सरवटकर
अमरावती (प्रतिनिधी)- अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत, फाटक्या कपड्यावर रोज सायकलवर तर कधी पायदळ शाळेत जाणारा भातकुली तालुक्यातील पूर्णानगर चा दिनकर तायडे आज विदर्भाच्या कान्या कोपऱ्यात गायन्याच्या माध्यमातून घराघरात पोहचला आहे. त्याला तो यावर्षीचा ” समाजरत्न 2025″ चा मानकरी ठरला आहे. त्यानिमित्ताने त्याच्या कार्यावर टाकलेला प्रकाश..
401 तास सतत 18 दिवस रात्र जगातील सगळ्यात मोठा रेकॉर्ड होल्डर.
भगवे वादळ, जय शिवराया, गुणवंत महाराज, भिकाजीं महाराज साई बाबा, यांच्या गीतांचे गीतकार गायक, कवी कार्यक्रमाच्या, माध्यमातून अनेक वृद्धाक्षम, सेंट्रल जेल सामाजिक संस्था येथे प्रबोधनव मनोरंजन.
मोझरी लगत असलेल्या मालधूर येथील समर्पण संस्था जी महिलोसाठी गेली 18 वर्षापासून कार्य करते त्या संस्थेत कार्यरत व संस्थेच्या मदतीसाठी 2011 पासून अनेक चॅरिटी शो केलेत.
स्वराध्या एंटरटेनमेंट च्या माध्यमातुन आता पर्यंत गरजू अंध, अपंग यांच्या मदतीसाठी अनेक चॅरिटी शो करून आता पर्यंत 10 लाखाची मदत.
जालना येथील मैत्रमांदीयाळी या संस्थेच्या मदतीसाठी श्री. प्रकाश आमटे व सो. मंदाताई आमचे यांच्या उपस्थितोत अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातुन मदत.
चिखली येथील सेवा संकल्प’ ही सामाजिक संस्था अनेक दिव्यांग, विकलांग, निराधार लोकांना मदत करणारी संस्था या संस्थेच्या उभारणीसाठी पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या समवेत चॅरिटी शो’ च्या माध्यमातुन मदत.
प्रश्न चिन्ह फासेपारधी आदिवासी मुलांच्या शाळेत प्रबोधनात्मक व जनजागृतीपर कार्यक्रम.
पंढरपूर येथील पालवी, ही संस्था जी एड्स बाधीत मुलांसाठी व काम करणान्या संस्थेसाठी प्रवोधनात्मक कार्यक्रम.
घाटंजी येथील रसिकाश्रय संस्था व दारुबंदी चळवळीसाठी कार्य.
यवतमाळ जिल्हातील आड नदी बचाव साठी डोकमेण्ट्री च्या माध्यमातुन जनजागृतो.
मेळघाट येथे अतिशय दुर्गम गाव ‘चुनखडी येथे ‘सिकल सेल’ या आजाराबाबत जनजागृती व मनोरंजन.
कोरोना काळात अंधू व गरजु कलाकारांना धान्य व जिवनावश्यक वस्तु देऊन मदत.
जळगाव येथील ‘शिवसह्याद्री ‘ प्रतिष्ठान या संस्थेसाठी शिवजन्म ते शिवराज्यभिषेक संकल्पनेचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर आधारीत भव्य दिव्य कार्यक्रम सादर करून मदत.
देशभक्ती, पोवाडे, भिमगीते असे अनेक कार्यक्रम व त्या माध्यमातून प्रबोधन.
Music Therapy च्या माध्यमातून अनेक संस्यामधील मानसिक आधार हरपलेल्या व विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना मदत व रोग निदान.
अमरावती येथील ‘सेंट्रल जेल’ मधील कैसे पांधवांच्या वैचारिक परिवर्तनासाठी प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रम.
अमरावती येथील ‘गोकुळ’आश्रम दस्ट या संस्थेच्या मदतीकरीता ‘साजन-विशाल ‘ या गायक व संगीतकार जोडी सोबत चॅरिटी शो.
अल्कोलिक आणनिमास या संस्थेत नशामुक्ती व दारूमुक्ती केलेल्या बांधवांसाठी मनोरंजन कार्यक्रम.
संत महात्मे यांच्या जिवनावर आधारीत अनेक CD संत वेगळा,जय शिवराय, वादळ भगवे,शिडी का राजा जय ज्योती जय क्रांती, महीमा मिकाजिचा, गुणवंत वाली
2024 चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त.
2024 चा अमरावती भूषण पुरस्कार प्राप्त.
जगातील सगळ्यात मोठा व सतत 401 तास 18 दिवस व 18 रात चालणारा इंडीयाज वर्ल्ड रेकॉर्ड.
अहमदाबाद येथे 9th Genius Indian achievers Award 2025 प्राप्त
2008 मध्ये मुंबई (वाशी) येथे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अमरावतीचे प्रतिनिधित्व करीत सतत 100 गाण्याचे गायन.
(ASEEM)काश्मीर साठी काम करणारी संस्था पुणे शेये परमविर चक्र पुरस्कार प्राप्त श्री बाणा सिंग यांना मानवंदना ‘शियाचिनच्या शौर्यगाथा या कार्यक्रमाच्या माध्यमातून*
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे आयोजन.
माधवबाग हार्ट हॉस्पिटल मधे रुग्णांसाठी म्युसिक थेरपी व मनोरंजनात्मक संगीत कार्यक्रम.
खासदार श्री. अमोल कोल्हे यांच्या छत्रपती संभाजी महाराज या अमरावती मधील कार्यक्रमात पोवाडे व शौर्यगीत गाऊन मनोरंजन.
गरजुंना वेळो वेळी रक्तदान करून आणि रक्त उपलब्ध करून देष्यास मदत.
अनेक कराओके स्पर्धाचे या यशस्वी आयोजन.
अमरावती येथील नवोदीत व हौशी कलाकारांसाठी प्रथम करोओके क्लब ची स्थापना 2017 पासून कार्यरत आहे.त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
