अमरावती(प्रतिनिधी- संजय सरवटकर
अमरावती(प्रतिनिधी) – या. द. व. कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तिवसा, जी अमरावती,राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा आयोजित,विशेष स्वच्छता,आरोग्य व श्रमसंस्कार शिबिर,भगवान परमहंस सत्यदेव महाराज संस्थान भारवाडी,तिवसा येथे गुरुवार दिनांक १४ रोजी पार पडले.या शिबिरात वऱ्हाडी कवी दिलीप शापामोहन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्रबोधनपर कवी संमेलनात शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे यांनी,”अपयश आले म्हणून काही खचू नका रे” या गझलेतून विद्यार्थ्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला.कवी पद्माकर मांडवधरे यांनी,राष्ट्रासाठी एक व्हा ही कविता विद्यार्थ्यांसमोर ठेवून देशहित महत्वाचे असल्याचे विचार मांडले. विद्रोही अविनाश गोंडाणे यांनी,”जब तेरे शहर मे रहा करते थे” ही भावनिक कविता सादर केली. कवयित्री मोहिनी शापामोहन यांनी मार्ग बुद्धाचा,पद्मा घरडे यांनी अप्रतिम स्त्री,कवी श्री. न.डोंगरे यांनी,दारूच्या नशेपाई बिस्कूट माह्य मुरल ही कविता सादर करीत व्यसन मुक्तीचा संदेश देत रंगत आणली.ज्येष्ठ कवी ठवरे गुरुजी यांनी समाजहितासाठी नावाची कविता सादर केली तर समृद्धी एदलाबादे यांनी माझी आई,सानिया मकेश्वर यांनी प्रणाम, पूर्वा निजामशाही यांनी मी बेरोजगार,दीपिका पांडे यांनी बाप,सम्यक तेलमोरे यांनी बचपन का वो जमाना,पल्लवी मते यांनी मित्र कोण शत्रू कोण, गौरव बऱ्हाणपुरे,शुभम मिरपुरे, प्राची पटोल,आदित्य बेले,चंचल निमावत,हर्षदा भुसारी ,रिजवान शेख या विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर कविता सादर केल्या. कवि संमेलनाचे अध्यक्ष दिलीप शापामोहन यांच्या, बोलो इंकलाब का नारा या कवितेने कवी संमेलनाची सांगता झाली.या द. व.महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख सर ,प्रा. सोळंके सर ,भुईभार मॅडम,टेकाडे सर यांच्या हस्ते सहभागी कवीचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
