दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी /सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा)
तालुक्यातील नायगाव येथे रयत शेतकरी गटाला जिल्हा व तालुका कृषी विभागाच्या मदतीने “माती परीक्षण लॅब” मिळाली असल्याचे गटाचे अध्यक्ष अविनाश राठोड आणि सचिव गजानन फुफाटे यांनी प्रसारमाध्यमासी सांगितले आहे.प्रगत गाव बनवण्यासाठी शेतकरी हा महत्त्वाचा आहे.शेती पिकली तर कुटुंबाचा,गाव,समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास साधला जातो.तालुक्यातील शेतकऱ्याची मातीचे परीक्षण करून त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले आहे.शुद्ध माती आणि पिकाच्या निरोगी वाढीसाठी खालील मूलद्रव्याची आवश्यकता असते त्यात पोटॅश,नायट्रोजन,कॅल्शियम, कोपर, मॅग्नेशियम,सल्फर,कार्बन, झिंक,बोरॉन इतर घटकाची आवश्यकता असते.हे वाढीसाठी आता नायगाव येथील लॅब मध्ये मातीचे परीक्षण होणार आहे.
ही मूलद्रव्य हवा,पाणी आणि जमिनीतून मिळत असतात.ही माती परीक्षण लॅब मिळवून देण्यासाठी कृषी जिल्हा अधीक्षक- दैनिनाथ कापसे,कृषी उपविभागीय अधिकारी रामराव रोडगे,जिल्हा प्रकल्प संचालक आत्मा अमोल आगवान,मंठा तालुका कृषी अधिकारी दयानंद वाघमोडे,मंठा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकआत्मा गटाचे राजेश्वर मोहादे इतर अधिकाऱ्याचे सहकार्य मिळाले असल्याचे गटाचे सचिव गजानन फुपाटे यांनी सांगितले आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घ्यावे असे आवाहन रयत शेतकरी गटाचे अध्यक्ष अविनाश राठोड आणि सचिव गजानन फुफाटे यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे.या गटाला माती परीक्षण लॅब मिळाल्यामुळे आमदार बबनराव लोणीकर,भारतीय जनता पार्टीचे सचिव राहुल लोणीकर,मा.सेल टॅक्स उपायुक्त बाबासाहेब राठोड आणि भाजपा तालुका अध्यक्ष नितीन राठोड इतरांनी अभिनंदन केले आहे.
