वैजापूर प्रतिनिधी / अरविंद पवार
प्रचंड मेहनत, अथक सराव आणि देशसेवेची जाज्वल्य भावना यांच्या बळावर कोल्ही येथील कृष्णा नानासाहेब पवार यांनी उल्लेखनीय यश संपादन करत
Territorial Army (TA) मध्ये दिमाखदार निवड मिळवली आहे.
त्यांच्या या यशामुळे गावासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साध्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या कृष्णा यांच्या आई-वडिलांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.
प्रतिकूल परिस्थिती, अपयश आणि कठीण संघर्षाचा सामना करतानाही त्यांनी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न कधीच सोडले नाही. अनेक अडथळ्यांवर मात करत अखेर त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घातली.
या यशामागे BMG अकॅडमी, वसू सायगाव येथील कठोर प्रशिक्षण तसेच गरजे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिस्तबद्ध तयारी, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कृष्णा यांनी हा संघर्षमय प्रवास विजयी केला.
ग्रामीण भागातील युवकांसाठी कृष्णा पवार यांचे यश प्रेरणादायी ठरत असून मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
कृष्णा नानासाहेब पवार यांच्या Territorial Army मधील निवडीबद्दल कोल्ही गावासह वैजापूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील देशसेवेसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
