दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा -मोहोळ प्रतिनिधी – बापू घळके
आई-वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून एका सातवीत वीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे मुलांची मने इतकी कमजोर, हलकी झाली आहेत की आत्महत्येसारखा विचार मुलांच्या मनात अगदी सहजपणे येतो.
ही घटना मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात घडली आहे मृत मुलाचे नाव यशराज धर्मराज डोके असे आहे. यशराज इयत्ता ७ वीत शिकत होता. गेले बरेच दिवस यशराज मोबाईलचा अतिवापर करत होता. शिवाय अभ्यासाचा कंटाळा देखील करत होता. ही गोष्ट त्याच्या पालकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे यशराजच्या पालकांनी जमेल तेवढं त्याला मोबाईलपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. शिवाय मोबाईल कमी करून अभ्यास कर असा सल्ला देखील दिला.गेल्या बऱ्याच दिवसापासून हे सुरु होत. त्यामुळे यशराज तणावात होता. मात्र रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे यशराज याने कटुंबीयांकडे मोबाईल मागितला, मात्र घरच्यांनी नकार दिला. मोबाईल न दिल्याने यशराज संतापाच्या भरात होता. घरी कोणी नसल्याची संधी साधून यशराज याने घरातील लोखंडी ऐंगलला साडीच्या साह्याने गळफास लावून घेतला. काही वेळाने वडील धर्मराज हे घरी आल्यानंतर यशराज दिसून आला नाही त्यावेळी त्यांनी खोलीकडे जाऊन पाहिले असता हाक मारली आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शिवाय आतून घातलेली घराला कडी उघडत नसल्याने कुटुंबीयांनी लोखंडी रॉडने कडी तोडली. त्यावेळी त्यांना यशराजने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ पेनूर येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस काॅन्सटेबल नाळे करीत आहेत. मात्र या घटनेने मोहोळ तालुक्यातील सर्व पालकांना हादरून सोडले आहे.
