प्रतिनिधी : स्वाती हडकर
चिपळूण : परिमल भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शहरातील राधाताई लाड सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आमदार निलेश राणे यांनी परिमल भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत पक्षवाढीसाठी त्यांच्या सहभागाचे स्वागत केले.
परिमल भोसले यांनी यावेळी बोलताना, “मी स्वतःला कायम कार्यकर्ता समजतो. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार,” असा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
