वसमत प्रतिनिधी -बालाजी अडकिने
शहरातील आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशन व स्किल्डो मार्शल आर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होळी सणानिमित्त क्लासमधील विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला.
या वेळी मास्टर कृष्णा देवणे, मास्टर शंतनु सूर्यवंशी, मास्टर विनायक रोडगे व मास्टर चैतन्य गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने एकमेकांना गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. कराटेच्या शिस्तबद्ध वातावरणातही सणाचा उत्साह तितक्याच जोमात दिसून आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गायकवाड सर उपस्थित होते. तसेच मास्टर दिक्षिता माळे, मास्टर राघिनी सोनवणे, मास्टर नंदनी पेंढारकर, मास्टर भूमिका पेंढारकर आणि मास्टर उत्कर्ष कदम यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आत्मरक्षेचे महत्त्व पटवून देत सण एकात्मतेने साजरा करण्याचा संदेश दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मास्टर विनायक रोडगे, शंतनु सूर्यवंशी, मास्टर सोहम धोंडे, मास्टर चैतन्य गव्हाणे, साई सूर्यवंशी, सार्थक किरगे, पलक शर्मा, गौरी स्वामी आणि सुवर्णा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
होळीच्या निमित्ताने कराटे क्लासमधील विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, शिस्त आणि आनंद यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळाले. सण आणि संस्कार यांची सांगड घालत हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
