दैनिक चालू वार्ता धाराशिव/ प्रतिनिधी -समीर मुल्ला
कळंब शहरातील तरुणांना शरीर सुदृढ बनवण्याऐवजी कळंब शहरातील तरुण पिढी ‘फुलचंद’ पानाच्या जीवघेण्या नशेत अडकत चालली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सातवी-आठवीतील शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन युवकांपर्यंत या पानाचे वेड पसरले असून, हे व्यसन त्यांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करत आहे.
‘मस्त वाटते’ किंवा ‘नशा येते’ या भावनेतून तरुण मुले एकमेकांपेक्षा जास्त ‘कडक’ पान बनवून देण्यावर भर देत आहेत. केवळ स्वतःच नाही, तर मित्राची टिंगल-टवाळी करण्यासाठी किंवा त्याची ‘मजा’ पाहण्यासाठी त्याला सक्तीने हे पान खायला देण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. सुरुवातीला गंमत म्हणून खाल्ले जाणारे हे पान कधी कायमस्वरूपी व्यसन बनते, हे या कोवळ्या मुलांना फुलचंद पानातील तीव्र रसायने आणि तंबाखूमुळे थेट मेंदूवर परिणाम होतो. यामुळे मेंदूचे भान हरपते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. सततच्या वापरामुळे तोंडाचा आणि घशाचा कर्करोग होण्याचा धोका १०० टक्क्यांनी वाढतो, किशोरवयीन मुलांच्या पचनसंस्थेवर आणि वाढीवर याचा विपरीत परिणाम होत आहे.
अनेक पालक आपल्या मुलांच्या बदलत्या वागण्याकडे आणि त्यांच्या खिशातील पैशांच्या खर्चाकडे डोळेझाक करत आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थी अगदी अल्पवयीन मुले देखील या पानाच्या आहारी जात आहेत. सुरुवातीला फक्त चवीसाठी म्हणून सुरू झालेले सेवनाने आता व्यसनाच्या राक्षसाचे रुप घेत आहे. त्याचे सामाजिक आणि आरोग्यविषयक परिणाम गंभीर स्वरूपात समोर येत आहेत. रासायनिक पदार्थामुळे हृदयविकारात धोका वाढणे व मानसिक अस्वस्थता, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे या लक्षणांमुळे तरुणांचे व अल्पवयीन मुलांचे वैयक्तिक आयुष्य धोक्यात येत आहे. या मुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे हे महत्वाचे लक्षण आहे.या मुळे तरुणांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत आहे. त्या मुळे या कडे सरकारने व समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे.
सर्वात दुर्दैवाची गोष्टी ही आहे की इतर ठिकाणी या पानाला मागणी आहेच,परंतु शाळा महाविद्यालयाच्या ठिकाणी याचा खप मोठ्या प्रमाणात आहे. कारण शाळेतील आठवी ते दहावी व महाविद्यालयातील तरुण मोठ्या प्रमाणात या पानाचे सेवन करत आहेत.
मुले शाळेत किंवा क्लासला गेल्यावर नेमके काय करतात, यावर पालकांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. मुलांच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणे हे त्यांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे, अशी भीती व्यक्त होत आहे.“कडक पान खाण्याच्या नादात मुले स्वतःचे आयुष्य अंधारात ढकलत आहेत. आज जरी त्यांना याचे परिणाम जाणवत नसले, तरी भविष्यात हे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरेल. पालकांनी आणि शिक्षकांनी वेळीच सावध होण्याची वेळ आली आहे.”
आपल्या मुलाच्या तोंडाचा वास, दातांचा रंग आणि त्याच्या मित्रांची संगत यावर लक्ष ठेवा. ‘फुलचंद’च्या विळख्यातून आपल्या लेकरांना वाचवावे असे आवाहन आम्ही दैनिक मराठवाडा परिवाराच्या च्या वतीने आपणास करीत आहोत.
