चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी -राजेंद्र पिसे
नातेपुते :विज्ञान प्रदर्शनाचा प्रभाव भविष्याचा पाया रचते जिथे वैज्ञानिक ज्ञान स्वीकारले जाते. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना वर्गात मिळवलेले ज्ञान वैज्ञानिक संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव शिक्षणाला बळकटी देतो व विज्ञान प्रदर्शनामुळे वैज्ञानिक शोध प्रयोगांना महत्त्व देणारी कौतुकास्पद संस्कृती निर्माण होते असे मत एस.एन.डी स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते येथील एस.एन.डी.इंटरनॅशनल (सीबीएसई ) स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाहुबली चंकेश्वरा, रेणुका पतसंस्थेचे व्हॉ. चेअरमन महेश शेटे, एस.एन.डी स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख, मा.मुख्याध्यापक प्रवीणकुमार बडवे, विज्ञान शिक्षक संजय नाळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक संदीप पानसरे, उप मुख्याध्यापक शकूर पटेल, प्राथमिक विभाग प्रमुख नीलम डोंबाळे, पीआरओ मनोज राऊत, सायन्स विभागाचे आदित्य दाभोळे, सुहास गुळीग, ज्योती मोरे, वर्षा गुळीग, सारीका पालवे, स्नेहल शिंदे हे उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी वैज्ञानिकांनी १४४ उपकरणाची मांडणी केली होती. यामध्ये सौर ऊर्जा, पर्यावरण, नैसर्गिक शेती, वाहन अपघात सुरक्षा व्यवस्था, शेती पशुपालन, सोलर सिस्टम वॉटर सायकल अशा अनेक विविध प्रतिकृती आणि प्रयोग प्रदर्शनात मांडले होते. यामध्ये इयत्ता तिसरीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक श्रेया जठार, नित्या दोशी, द्वितीय क्रमांक श्लोक जाडकर, तृतीय क्रमांक देवांशी निकम, ईश्वरी पोळ, पूर्वी जाधव, इयत्ता चौथीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक पुनीत गांधी, आयांश मेहता, द्वितीय क्रमांक रुचिता पटेल, अद्विका ठोंबरे, धनश्री साळवे, श्रीराज धांडे, तृतीय क्रमांक अजिंक्य शिंदे, युवराज देवकुळे, ओंकार चोपडे, तृतीय क्रमांक मध्ये रितू पाटील, संस्कार भोसले, साईराज सांगळे, साहिल शिंदे, श्लोक पलंगे, इयत्ता पाचवी मध्ये प्रथम क्रमांक अनघा खडतरे, क्रीतिका वर्पे, द्वितीय क्रमांक मध्ये इशिता कुलकर्णी, कृष्णराज पांढरे, समर्थ माने, अनिरुद्ध फडतरे, तृतीय क्रमांक मध्ये तेजस्विनी जाधव, परिणीती सावंत, वैष्णवी वलेकर, श्रीराम उराडे, पार्श्व दोशी, ऋतुराज लाळगे, इयत्ता सहावी व सातवी मध्ये प्रथम क्रमांक गौरव पानसरे, मयूर मोरे, द्वितीय क्रमांक मध्ये आर्या जठार, नेत्रा इंगोले, करण डूड्डू, विहान बरडकर, तृतीय क्रमांक अर्णव जाधव, स्वप्निल डुबल, मित चंकेश्वरा, अनय लवटे, इयत्ता आठवी व नववी प्रथम क्रमांक सुस्मित गावडे, द्वितीय ज्ञानेश्वरी गटकुळ, तृतीय क्रमांक अर्णव उराडे, सार्थक शेंडे, ऐश्वर्या सुळे, वेदिका उराडे या विद्यार्थ्यांनी नंबर मिळवले. परीक्षक म्हणून मा.मुख्याध्यापक प्रवीणकुमार बडवे, विज्ञान विषयाचे शिक्षक संजय नाळे यांनी काम पाहिले सध्या वाढत्या ऊर्जेची मागणी लक्षात घेता विद्यार्थांनी स्वयंचलित ऊर्जा निर्मिती यंत्राचे संशोधन लक्षवेधी ठरले. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित पालकांनी विद्यार्थी निर्मित उपकरणांचे निरीक्षण करत बालवैज्ञानिकांचे कौतुक केले.
