गडचिरोली -विजय शेडमाके.
गडचिरोली:-गडचिरोली शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ११ महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे मृत बालिकेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या अलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याच्या गंभीर आरोप केला असून या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली तालुक्यातील दिभना या गावाच्या लेनगुरे कुटुंबातील वंशिका वय(११) महिने या बालिकेला किरकोळ उपचारासाठी मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दाखल केल्यानंतर डॉक्टरकडून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि पुढील उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास बालिकेच्या अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली प्राथमिक माहितीनुसार निमोनिया मुळे श्वास गुदमरल्याने बालिकेच्या मृत्यू झाला असावा अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. भूत बालिकेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार बालेकिल्ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे किंवा तिला निमोनिया आहे अशी कोणतीही माहिती डॉक्टरकडून देण्यात आली नव्हती.
कुटुंबीयांनी वारंवार विचारणा करूनही “बालिकेची प्रकृती ठीक आहे, घाबरण्याचे कारण नाही”असे सांगत डॉक्टर वेळ मारून नेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोषी डॉक्टर संपर्क बाहेर असल्याची चर्चा…
या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली शहरातील काही राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली या प्रकरणात अलगर्जीपणाच्या आरोप असलेले डॉक्टर आशिष शर्मा के हे घटनेनंतर संपर्क बाहेर असल्याची माहिती समोर आली असून रुग्णालय प्रशासनालाही त्याच्या ठावठिकाणी लागत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सतत नातेवाईकांची कारवाईची मागणी..
देखा घटनेनंतर सतत झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टर आशिष शर्मा की यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून बंडतर्फे करावे अशी मागणी केली आहे वाळताना लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचरणे केले.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नातेवाईकांशी चर्चा करत परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच पोस्टमार्टम अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
रुग्णालय प्रशासनाचे स्पष्टीकरण… दरम्यान जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या अध्यक्ष डॉक्टर माधुरी किल्ला के यांनी सांगितले की बालिका वंशिकाला काल दुपारी सुमारे १२:३० वाजता दाखल करण्यात आले होते त्यावेळी तिच्या शरीरातील ऑक्सिजनची कमतरता किंवा निमोनियाची गंभीर लक्षणे आढळून आली नव्हती. मात्र अचानक निमोनियामुळे तिच्या गळ्यात कप साचून श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला असावा. अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. या घटनेची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल अशी त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान अवघ्या ११ महिन्याच्या निष्पा पालिकेच्या मृत्यू झाल्याने तिच्या आई-वडिलांनी रुग्णालयातच आकस व्यक्त केला आपल्या लेखाच्या मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत दोशीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्र्याच्या पालकत्व असलेल्या जिल्ह्याच्या मुख्यालयातच आरोपी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणात प्रशासन नेमकी काय कार्यवाही करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
